नवी दिल्ली :देशातील लघु आणि मध्यम उद्योग हे उद्ध्वस्त होत आहेत. यासाठी लवकरच सरकारने काही उपाययोजना नाही केली, तर देशात आर्थिक त्सुनामी येण्याची दाट शक्यता आहे, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
काही महिन्यांपूर्वी मी 'नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स'चा (एनपीए) मुद्दा उपस्थित केला होता, तर भाजपने माझ्यावर टीका केली होती. मात्र, आता देशातील बँकांची स्थिती पाहता त्या डबघाईला आलेल्या दिसून येत आहे. देशातील लघु-मध्यम उद्योगही उद्ध्वस्त होत आहेत. तर मोठ्या कंपन्याही आर्थिक तणावाखाली आहेत, असे मत राहुल गांधींनी ट्विटरवर व्यक्त केले आहे.