महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश - veerappans daughter Vidya Rani in politics

पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर राव आणि माजी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्णन या वेळी उपस्थित होते. या वेळी, विद्या राणी यांच्यासह विविध पक्षांच्या एक हजार सदस्यांनी भाजप प्रवेश केला.

पोलीस चकमकीत ठार झालेल्या चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजप प्रवेश
पोलीस चकमकीत ठार झालेल्या चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजप प्रवेश

By

Published : Feb 23, 2020, 7:59 PM IST

कृष्णागिरी - पोलीस चकमकीत ठार झालेल्या चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी विद्या राणी यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. एका जाहीर कार्यक्रमात विद्या राणी यांनी भाजप प्रवेश केला.

'मला गरीब आणि वंचितांसाठी त्यांची जात किंवा धर्म न पाहता काम करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. मला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत,' असे विद्या या वेळी म्हणाल्या.

हेही वाचा - नमस्ते ट्रम्प : भारत-अमेरिकेदरम्यान होणार महत्त्वाचे सुरक्षा करार..

पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर राव आणि माजी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्णन या वेळी उपस्थित होते. विद्या राणी यांच्यासह विविध पक्षांच्या एक हजार सदस्यांनी भाजप प्रवेश केला.

हेही वाचा - VIDEO : पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली सहा मजली इमारत..

ABOUT THE AUTHOR

...view details