नवी दिल्ली -देशात गेल्या २४ तासांत ६४ हजार ५३१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, एका दिवसात १ हजार ९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा २७ लाख ६७ हजार २७४ वर पोहोचला आहे. यापैकी ६ लाख ७६ हजार ५१४ सक्रीय रुग्ण आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली.
देशात गेल्या २४ तासांत ६४ हजार नवे कोरोना रुग्ण, १ हजार ९२ मृत्यू
देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा २७ लाख ६७ हजार २७४ वर पोहोचला आहे. यापैकी ६ लाख ७६ हजार ५१४ सक्रीय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत ५२ हजार ८८९ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही दिलासादायक आहे. संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या २० लाख ३७ हजार ८७१ वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत ५२ हजार ८८९ जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतात लॉकडाऊन सुरू केल्यापासून आज १४८ वा दिवस आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता हळूहळू यात सूट देण्यात येत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावासियांना केले आहे.