मुंबई - २०११ साली भारताने जिंकलेल्या विश्वकरंडकाचा खरा नायक ठरला तो सिक्सर किंग युवराज सिंगच... कारण युवराजने या मालिकेत अष्टपैलु कामगिरी केली होती. २००७ च्या विश्वचषकात भारताला साखळी सामन्यातूनच बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे २०११ मध्ये घरच्या मैदानावर खेळण्याचे भारतीय संघावर दडपण होते आणि सचिनचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्याने सर्वांवरच दडपण होते, मात्र युवराजच्या मनात काही वेगळेच सुरू होते.
रक्ताच्या उलट्या होऊनही तो जिद्द हरला नाही; अखेर भारताला विजय मिळवून दिला - shri lanka
युवराज सिंग हा आयसीसी टुर्नामेंट गाजवणारा एकमेव खेळाडू आहे. २००२ च्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने शानदार खेळी केली होती. त्यानंतर त्याला थेट भारतीय संघात स्थान मिळाले. २००७ च्या टी-20 वर्ल्ड कपमधील त्याचा तो विक्रम अद्याप अबाधित आहे. आतापर्यंत भल्याभल्यांना जे जमलं नाही ते युवीने केलं आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ६ चेंडूत ६ षटकार लगावणारा तो पहिला फलंदाज होता.
१९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यानतंर तब्बल २८ वर्षांनंतर भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती. २०११ च्या सामन्यावेळी वर्ल्डकपमध्ये युवराज तुफान फार्मात होता, त्याने या मालिकेत ८ सामन्यात ९०.५० च्या सरासरीने ३६२ धावा केल्या तर ९ सामन्यात १५ बळी घेतले. त्यामुळे युवराजला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. उपांत्य फेरी पूर्वीच्या शेवटच्या सामन्यात युवराजला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या, मात्र त्याने कुणालाही याबाबतची माहिती दिली नाही, तो जिद्द हरला नाही, कारण त्याच्या मनात एका विशेष खेळाडूसाठी हे वर्ल्डकप खेळत असल्याचे सांगितले होते. त्याचे नाव त्याने अखेरपर्यंत सांगितले नाही. विश्वचषक जिंकल्यानंतरच त्याने तो विशेष खेळाडू सचिन तेंडुलकर असल्याचे सांगितले. सचिनला अलविदा गिफ्ट देऊन तो थांबला. हार्ड हिटर युवराज सिंग नसता तर, कदाचित सचिन तेंडुलकरचे स्वप्न अपूर्ण राहिले असते.
तो विक्रम अद्याप अबाधित
युवराज सिंग हा आयसीसी टुर्नामेंट गाजवणारा एकमेव खेळाडू आहे. २००२ च्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने शानदार खेळी केली होती. त्यानंतर त्याला थेट भारतीय संघात स्थान मिळाले. २००७ च्या टी-20 वर्ल्ड कपमधील त्याचा तो विक्रम अद्याप अबाधित आहे. आतापर्यंत भल्याभल्यांना जे जमलं नाही ते युवीने केलं आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ६ चेंडूत ६ षटकार लगावणारा तो पहिला फलंदाज होता.
वर्ल्डकप करिअरमध्ये युवराज सिंगने आतापर्यंत २३ सामने खेळले आहेत. यात त्याने ५२.७१ च्या सरासरीने ७३८ धावा केल्या आहेत.
शेवटचा सामना - युवराज सिंगला कर्करोगामुळे काही काळ विश्रांती घ्यावी लागली होती. २०१७ मध्ये त्याचे पुनरागमन झाले. २०१७ मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर तो कधीही आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकला नाही. आता निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग आयसीसीच्या विदेशी टी-20 लीगमध्ये करिअर करण्याच्या विचारात आहे.