महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तेलंगणात दिवाळीदरम्यान घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 तरुण बुडाले - Six youths drowned in Telangana

रविवारी पोलिसांनी सांगितले की गोदावरी नदीत पोहताना चार तरुण बुडाले तर, दोन जण शनिवारी रात्री उशिरा निजामनगर प्रकल्पात बुडाले. मुलुगु जिल्ह्यातील गोदावरीमध्ये बुडालेले चार तरुण जिल्ह्यातील व्यंकटापुरम मंडळाचे आहेत. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. तर, तिघांचा शोध सुरू आहे.

तेलंगणा बुडून मृत्यू न्यूज
तेलंगणा बुडून मृत्यू न्यूज

By

Published : Nov 15, 2020, 4:54 PM IST

हैदराबाद - दिवाळी सणाच्या दरम्यान तेलंगणात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 तरुण बुडाले. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. तर, उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.

रविवारी पोलिसांनी सांगितले की गोदावरी नदीत पोहताना चार तरुण बुडाले तर, दोन जण शनिवारी रात्री उशिरा निजामनगर प्रकल्पात बुडाले. मुलुगु जिल्ह्यातील गोदावरीमध्ये बुडालेले चार तरुण जिल्ह्यातील व्यंकटापुरम मंडळाचे आहेत.

हेही वाचा -पाक लष्कराच्या गोळीबारात आसामधील जवानाला वीरमरण

पोलिसांनी सांगितले की, दोन तरुणांच्या मृतदेहांची ओळख पटवली गेली आहे. तुममू तार्तिक आणि रामवरापु प्रकाश अशी त्यांची नावे आहेत. पाणबुडे अनिविश आणि श्रीकांत यांचा शोध घेत आहेत.

कामरेड्डी जिल्ह्यात झालेल्या घटनेच्या वेळी कल्लेरू मंडळाचे 5 तरुण निजामनगर प्रकल्पात आंघोळीसाठी गेले होते. पूर गेटजवळ आंघोळ करत असताना यातील दोघे खोल पाण्यात गेले आणि बुडाले. पाणबुड्यांनी सुनीर नावाच्या युवकाचा मृतदेह शोधून काढला आहे. तर, दुसरा तरुण शिव याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा -शांतिवनमध्ये जाऊन राहुल गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंना वाहिली श्रद्धांजली..!

ABOUT THE AUTHOR

...view details