गांधीनगर - कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. अनेक नागरिकही आपापल्यापरिने या कामासाठी मदत करत आहेत. यात गुजरातमधील एका सहा महिन्याच्या चिमुरडीचा समावेश झाला आहे.
सहा महिन्यांची चिमुरडी करतेय कोरोनाबाबत जनजागृती! - स्टे होम'
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. अनेक नागरिकही आपापल्यापरिने या कामासाठी मदत करत आहेत. यात गुजरातमधील एका सहा महिन्याच्या चिमुरडीचा समावेश झाला आहे. धरमपूर येथील रहिवासी असलेल कुणालभाई पंड्या यांची ही मुलगी असून तिचे नाव हेतवी आहे.
धरमपूर येथील रहिवासी असलेल कुणालभाई पंड्या यांची ही मुलगी असून तिचे नाव हेतवी आहे. कुणाल यांनी सोशल मिडीयावर हेतवीचे काही फोटो अपलोड केले आहेत. त्यात हेतवी मास्क आणि सॅनिटायझरने वेढलेली दिसत आहे. विविध फोटोंमधून 'स्टे होम' असा संदेशही दिलेला दिसत आहे.
लहानमुले सर्वांनाच आवडतात म्हणून मुलगी हेतवीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे, असे कुणाल पंड्या यांनी सांगितले. कुणाल हे महसूल विभागात कार्यरत असून कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी हेतवीच्या माध्यमातून लोकांना कोरोनाबाबत गंभीर होण्याचा सल्ला दिला आहे.