पाटणा - पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पोलीस उपायुक्त संजय भाटिया यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
स्पाईस जेटच्या विमानात सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू - उपचार
पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आज सकाळच्या पाटणा येथून दिल्लीला येणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानामध्ये लहान बाळाचा मत्यू झाला आहे. बाळाला हृदयासंबधीत आजार असल्यामुळे उपाचारासाठी त्याचे पालक बाळाला दिल्लीला घेऊन येत होते. यावेळी विमानामध्ये बाळाचा मृत्यू झाला आहे.
ज्या फ्लाईटमध्ये बाळाचा मृत्यू झाला त्याचा नंबर 8481 होता. बाळाचे नाव रचिता कुमारी असे आहे. बाळाच्या वडिलांचे नाव राजेंद्र राजन निवासी निंगा असे आहे. तर बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील बरौनी या गावातील ते रहिवासी आहेत.