सितापूर- उत्तरप्रदेशातील सितापूर जिल्ह्यात तेवडा चिलौला येथे टँकर आणि ट्रॉलीच्या अपघातात ६ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. सोमवारी रात्री झालेल्या या अपघातात ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरला टँकरची जोरदार धडक, ६ जागीच ठार - ट्रॉमा
भरधाव वेगात असलेल्या तेल वाहतुक करणाऱ्या टँकरने वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरला जोरात धडक दिली. यामध्ये ट्रॉलीत बसलेल्या ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, ७ जण गंभीर जखमी झाले.
सितापूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त एल. आर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जवळपास ४० लोक विवाह समारंभासाठी जात होते. यादरम्यान, भरधाव वेगात असलेल्या तेल वाहतुक करणाऱ्या टँकरने वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरला जोरात धडक दिली. यामध्ये ट्रॉलीत बसलेल्या ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, ७ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सितापूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. परंतु, गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना लखनौ येथील ट्रॉमा सेंटरला पाठवण्यात आले आहे.