महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

त्रिपुरा : शरणार्थी छावणीत भुकेचे सहा बळी; केंद्र सरकारने बंद केले होते रेशन - त्रिपुरा शरणार्थी छावणी

त्रिपुराच्या कांचनपूर, निसिंगपाडा आणि हमसापाडा या गावांमधील शरणार्थी छावण्यांमध्ये या घटना घडल्या आहेत. अन्न उपलब्ध नसल्यामुळे येथील या माता आपल्या लहानग्यांना दूधही पाजू शकत नाहीत. त्यामुळेच, अवघ्या चार महिन्यांच्या पिगली रियांगचा मृत्यू झाला आहे. तर उपासमारीमुळे ३१ ऑक्टोबरला माकटा रियांग या ६५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ३ नोव्हेंबरलाही अक्सो मोल्सोई आणि त्याची आई घोमा रियांग यांचा उपासमारीने मृत्यू झाला होता. अवघ्या तीन वर्षांच्या अजितारी रियांगचाही यामुळेच मृत्यू झाला आहे.

त्रिपुरा : शरणार्थी छावणीत भुकेचे सहा बळी; केंद्र सरकारने बंद केले होते रेशन

By

Published : Nov 6, 2019, 11:23 PM IST

Updated : Nov 7, 2019, 9:05 AM IST

आगरतळा - त्रिपुरामधील एका शरणार्थी छावणीत उपासमारीमुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. 'ब्रु' समाजाच्या शरणार्थींचे रेशन कार्ड केंद्र सरकारकडून बंद करण्यात आले होते. शरणार्थी छावण्यांमध्येही अन्न उपलब्ध नसल्यामुळे या लोकांचा बळी जातो आहे. गेल्या एका आठवड्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये चार लहानग्यांचा समावेश आहे. त्यामुळे, ब्रु समाजाचे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

त्रिपुराच्या कांचनपूर, निसिंगपाडा आणि हमसापाडा या गावांमधील शरणार्थी छावण्यांमध्ये या घटना घडल्या आहेत. अन्न उपलब्ध नसल्यामुळे इथल्या माता आपल्या लहानग्यांना दूधही पाजू शकत नाहीत. त्यामुळेच, अवघ्या चार महिन्यांच्या पिगली रियांगचा मृत्यू झाला आहे. तर उपासमारीमुळे ३१ ऑक्टोबरला माकटा रियांग या ६५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ३ नोव्हेंबरलाही अक्सो मोल्सोई आणि त्याची आई घोमा रियांग यांचा उपासमारीने मृत्यू झाला होता. अवघ्या तीन वर्षांच्या अजितारी रियांगचाही यामुळेच मृत्यू झाला आहे.

'मिझो ब्रु डिस्प्लेस्ड पीपल्स फोरम'ने दिलेल्या अहवालानुसार, उपासमारीमुळे बऱ्याच लोकांची प्रकृती खालावली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा समावेश आहे. या मृत्यूंमुळे परिसरातील वातावरण पेटले आहे. त्यामुळे कांचनपूर भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ब्रू समाजाच्या लोकांनी केंद्र सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिपुरा येथे एक समिती पाठविण्यास सांगितले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्रिपुराचे राजपूत्र प्रद्युत किशोर घटनास्थळी दाखल झाले, आणि त्यांनी बिप्लब देब सरकारवर टीका केली.

अलीकडेच त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब म्हणाले होते, की निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्या ब्रू लोकांनी आधी त्यांची मातृभूमी असलेल्या मिझोराम येथे जावे. केंद्र आणि मिझो सरकार यांच्यात चर्चा होणे आवश्यक आहे, आणि सरकारने त्यांना यासाठी मदत करायला हवी. ब्रु लोकांना त्यांच्या मायदेशी परत नेण्याचा केंद्र सरकारचा हा नववा प्रयत्न होता जो व्यर्थ ठरला. केंद्र सरकारने सांगितले, की ब्रू लोकांना त्यांच्या घरी नेण्याचा हा केंद्राचा अखेरचा प्रयत्न होता, त्यानंतर कांचनपूर येथील निर्वासित छावणी रिकामी केली जाईल.

केंद्र, त्रिपुरा आणि मिझोरम सरकारने प्रयत्न करूनही केवळ १२५ कुटुंबे आणि ७०० लोक मिझोरममध्ये जाण्यास तयार झाले. असे म्हटले जाऊ शकते, की 1997 मध्ये मिझोस बरोबर ब्रसची वांशिक झुंज झाली, आणि त्यामधून 7 हजार ब्रूस त्रिपुराला आले. मिझोराममध्ये आता ४०,००० ब्रु आहेत. तर, १०,००० ब्रु हे उत्तर त्रिपुराच्या निर्वासित छावण्यांमध्ये रहात आहेत.

Last Updated : Nov 7, 2019, 9:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details