नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलीस निरीक्षक सुबोध सिंह यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य सहा आरोपींना जामीन मिळाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांचे तुरुंगाबाहेर जोरदार स्वागत केले आहे.
बुलंदशहर हिंसाचार: इन्स्पेक्टर सुबोध सिंह हत्याप्रकरणातील मुख्य आरोपींचे जल्लोषात स्वागत - स्वागत
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलीस निरीक्षक सुबोध सिंह यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य सहा आरोपींना जामीन मिळाला आहे.
बुलंदशहराजवळील चिंगरावठा येथे तथाकथित गोरक्षकांच्या झुंडीने पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 22 आरोपींसह 50 ते 60 अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. यामधील सहा आरोपींनी जामीनासाठी अर्ज केला होता. प्रयागराज उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
काय प्रकरण-
उत्तर प्रदेशातील बुलंदशहराजवळ असलेल्या महागावमध्ये गोमांस सापडले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याचे पडसाद चिंगरावठी येथेही उमटले होते. जमावाने रास्ता रोको केला. यावेळी हिंसक झालेल्या जमावाने वाहनांची तोडफोड करीत जाळपोळ केली. यावेळी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांच्यासह दोघांची गोळ्या घालून हत्या केली होती. तसेच सुबोध कुमार यांच्यावर कुऱ्हाडीनेही वार करण्यात आले होते.