महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाचा सर्वाधिक फटका स्थलांतरित मजुरांना; शहर सोडून धरली गावची वाट - कामगार

लॉकडाऊनमुळे मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था योग्यरितीने होत नाही. यामुळेच कामगार मोठ्या संख्येने गावाकडे जात आहेत. 'आम्हाला गावी परत जायचे आहे. येथील प्रशासनाने ३०हून अधिक लोकांमध्ये केवळ २० किलो आटा आणि अर्धा किलो तेल दिले आहे. यातून आमचे पोट कसे भरणार', असा सवाल कामगारांनी केला आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका स्थलांतरित मजुरांना; शहर सोडून धरली गावची वाट

By

Published : Apr 17, 2020, 7:19 PM IST

जयपूर - सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. संचारबंदीमुळे सर्वात जास्त फटका स्थलांतरित मजुरांना बसला आहे. कामासाठी आपले गाव सोडून शहर जवळ करणारे नागरिक संकटात आहेत. राजस्थानच्या पोखरण प्रशासनाच्या बेजबाबदारीमुळे नाराज होऊन मजूर पायी चालत आपले गाव गाठत आहेत. लहान मुले रडून अस्वस्थ होत आहेत.

लॉकडाऊनमुळे मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था योग्यरितीने होत नाही. यामुळेच कामगार मोठ्या संख्येने गावाकडे जात आहेत. 'आम्हाला गावी परत जायचे आहे. येथील प्रशासनाने ३०हून अधिक लोकांमध्ये केवळ २० किलो आटा आणि अर्धा किलो तेल दिले आहे. यातून आमचे पोट कसे भरणार', असा सवाल कामगारांनी केला आहे.

लॉकडाऊनमुळे मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था योग्यरितीने होत नाही. यामुळेच कामगार मोठ्या संख्येने गावाकडे जात आहेत. 'आम्हाला गावी परत जायचे आहे. येथील प्रशासनाने ३०हून अधिक लोकांमध्ये केवळ २० किलो आटा आणि अर्धा किलो तेल दिले आहे. यातून आमचे पोट कसे भरणार', असा सवाल कामगारांनी केला आहे.

मजूर गावाकडे जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली. यानंतर पोलिसांनी सर्वांना वाटेतच अडवले. यावेळी कामगारांनी आपबिती सांगितली. पोलिसांनी विनंती केल्यावर मजूर आपल्या आश्रयस्थानी जाण्यास तयार झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details