नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी राज्यसभेत आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत होत्या. यावेळी काही भाजपच्या काही नेत्यांना सभागृहात डुलकी लागल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांची ही छायाचित्रे सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
भाजपच्या 'या' नेत्यांना सभागृहात लागली डुलकी... - नेत्यांना सभागृहात लागली डुलकी
भाजपच्या काही नेत्यांना सभागृहात डुलकी लागल्याचे पाहायला मिळाले आहे.
डुलकी
निर्मला सीतारामन देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल सभागृहात बोलत होत्या. त्यावेळी भाजपचे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री महेंद्र नाथ पांडे, केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते झोप काढत असताना पाहायला मिळाले. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजपचे खासदार अनुराग ठाकूर जांभया देताना दिसले.
विशेष म्हणजे मोदी सरकारचे हे तीन मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अगदी मागच्या रांगेतच बसले होते. यावेळी एका नेत्याने त्या दोघांना जागे केले.