मलप्पुरम -केरळमधील अर्चना आणि मुरलीका या दोन बहिणी आपल्या आईने लिहिलेल्या कवितांची पुस्तके घेऊन चक्क पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. ही पुस्तके विकून त्यातून जमणारे पैसे या मुली पूरग्रस्तांना मदत म्हणून देत आहेत. या बहिणी मलप्पुरम जिल्ह्यातील कोट्टापुरम तालुक्यातील वाळांचेरी येथील आहेत.
आईच्या कविता विकून बहिणी करतायेत केरळमधील पूरग्रस्तांना मदत
या कविता संग्रहाचे नाव आहे 'पचीला'. या कवीता त्यांची आई देवी यांनी लिहिल्या आहेत. त्या शिक्षिका आहेत. या पुस्तकातून या मुलींनी जवळपास ४ हजार रुपये जमवले आहेत.
या कविता संग्रहाचे नाव आहे 'पचीला'. या कविता त्यांची आई देवी यांनी लिहिल्या आहेत. त्या शिक्षिका आहेत. या पुस्तकातून या मुलींनी ४ हजार रुपये जमवले आहेत.
अर्चना ११ व्या तर तिची छोटी बहीण ५ व्या वर्गात शिकते. अमलकृष्णा, अनुराग आणि श्यामप्रसाद हे या बहिणींना ही कवितांची पुस्तके विकण्यात मदत करत आहेत. एवढेच नाही, तर अनेक दुकानदारही या बहिणींच्या मदतीसाठी सरसावले आहेत. अतापर्यंत या पुस्तक विक्रीतून त्यांनी जवळपास ४ हजार रुपये मिळवले आहेत. शक्य तेवढ्या लवकर ही सर्व देणगी त्या पूरग्रस्तांना देणार आहेत.