शिमला -कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसता आहे. लॉकडाऊनमुळे यंदा मधमाशीचा पुरवठा होत नसल्यामुळे सफरचंदचे उत्पादन घेणारा शेतकरी चिंतेत आहे. मात्र, हिमाचल प्रदेशातील रोहडू येथील युवक सन्नीने सिराना प्रजातीच्या मधमाशांचे उत्पन्न करत यावर तोडगा काढला असून सफरचंदासाठी सिरानी माशा या वरदान ठरत आहेत.
मधमाशी पालन आणि सफरचंदाचे उत्पादन हे एकमेकांवर अवलंबून असते. मार्च ते एप्रील महीन्यांपर्यंत सफरचंदच्या झाडांवर फुलांचा मोहर येतो. या वेळीच मधमाशी सफरचंदच्या फुलांतून रस शोषून मध तयार करते. यामुळे सफरचंदचे उत्पन्न चांगले होते. तसेच मध उत्पादनही उत्तम होतो.
हिमाचलचे व्यापारी दरवर्षी सफरचंदच्या वृक्षांच्या पराग कणासाठी हरियाणा आणि राजस्थानातून मधमाशा आयात करतात. पण, संचारबंदीमुळे मधमाशीची वाहतूक बंद असल्याने हिमाचल प्रदेशातील रोहडू येथील युवक सन्नीने सिराना प्रजातिच्या मधमाशांची पैदास सुरु केली आहे.