नवी दिल्ली - एकवेळ वापर होवू शकणाऱ्या प्लास्टिकचा ऐतिहासिक स्मारकात वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केली. ते पर्यटन पर्वाच्या कार्यक्रमात बोलत होते.
ऐतिहासिक स्मारकापासून १०० मीटरपर्यंत एकवेळ वापर होवू शकणाऱ्या प्लास्टिकवर बंदी लागू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवेळ वापर होवू शकणाऱ्या प्लास्टिक बंद करण्याबाबत जनतेला आवाहन केले होते.
हेही वाचा - वर्ष उलटूनही पूर्णपणे प्लास्टिक बंदी नाही, मुंबईत प्लास्टिकचा खुलेआम वापर
महात्मा गांधींच्या जयंतीदिवशी एकवेळ वापर होवू शकणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय आज जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, हा निर्णय आज घेण्यात आला नाही. असा निर्णय घेतल्यास मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मितीवर परिणाम होईल, अशी भीती अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा -प्लास्टिक प्रदूषणामुळे महासागर तुंबतायत; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता..