अंबिकापूर - छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी एक अनोखा उपाय करण्यात आला आहे. येथे चक्क गार्बेज कॅफे सुरू करण्यात आला आहे. या कॅफेमध्ये प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात लोकांना जेवण दिले जाते. 'एक किलो प्लास्टिक कचरा आणून द्या आणि एक थाळी जेवण मिळवा' अशी ही संकल्पना आहे. या कॅफेची सुरुवात अंबिकापूर नगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात या प्रयोगाचे कौतुक होत आहे.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक कचरा द्या आणि पोटभर जेवण करा - एक किलो प्लास्टिकच्या बदल्यात एक थाळी जेवण
गार्बेज कॅफेमध्ये रोज अनेक गरीब लोक जेवण करण्यासाठी येतात, हेच या प्रयोगाचे सर्वांत मोठे यश आहे. येथे पैशांच्या बदल्यात जेवण मिळतच नाही. तर, केवळ प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यातच मिळते. त्यामुळे येथे गरीब आणि बेघर लोकांच्या जेवणाची सोय झाली आहे.
गार्बेज कॅफेमध्ये रोज अनेक गरीब लोक जेवण करण्यासाठी येतात, हेच या प्रयोगाचे सर्वांत मोठे यश आहे. येथे पैशांच्या बदल्यात जेवण मिळतच नाही. तर, केवळ प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यातच मिळते. त्यामुळे येथे गरीब आणि बेघर लोकांच्या जेवणाची सोय झाली आहे. हा देशातील पहिला गार्बेज कॅफे आहे. कॅफेमध्ये दररोज १० ते २० किलो प्लास्टिक जमा होते.
येथे जमा झालेला प्लास्टिक कचरा अंबिकापूर नगरपालिकेच्या सॅनिटरी पार्कमधील रिसायकलिंग सेंटरमध्ये (पुनर्निमाण केंद्र) आणला जातो. येथे या कचऱ्यावर प्रक्रिया करून तो रस्ते निर्माणाच्या कामात वापरला जात आहे. या कॅफेचे संचलन महिलांच्या स्वावलंबन समूहांद्वारे केले जात आहे. यामुळे या प्रयोगातून महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कचरा वेचक कामगारही सर्व प्लास्टिक कचऱ्याची पुनर्निमिती होण्यामध्ये योगदान देत आहेत.