वाराणसी (उ.प्र)- भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर प्लास्टिक बंदीचा संकल्प केलेला आहे. या पार्श्वभूमीवर वाराणसी रेल्वे स्थानक प्रशासनाने परिसरातील खाद्य विक्रेत्यांना टेराकोटा निर्मित मातीचे कप 'कुल्हड', ग्लास आणि प्लेट वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मातीची भांडी निर्माण करणाऱ्या कुभारांना मोठी संधी निर्माण झाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. पर्यावरणाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आयआरसीटीसी संचालित विक्रेते आणि खाजगी विक्रेत्यांनी चहा आणि काँफी या सारखी पेय पदार्थ मातीच्या कपमध्ये देण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वाराणसी रेल्वे स्थानकाने संपूर्ण रेल्वे परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार केला आहे.