महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 76 हजार 472 जणांचा संसर्ग ; 1 हजार 21 जणांचा बळी - कोरोना रुग्णांची लेटेस्ट आकडेवारी

गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 76 हजार 472 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 हजार 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी एका दिवसात तब्बल 9 लाख 28 हजार 761 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Aug 29, 2020, 12:03 PM IST

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 76 हजार 472 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 हजार 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवारी एका दिवसात तब्बल 9 लाख 28 हजार 761 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी ही तब्बल 34 लाख 63 हजार 972 झाली आहे. तर 7 लाक 52 हजार 424 रुग्ण सक्रिय असून 26 लाख 48 हजार 999 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 62 हजार 550 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर शुक्रवारपर्यंत 4 कोटी 4 लाख 6 हजार 609 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

देशभरामध्ये सर्वांत जास्त 23 हजार 775 मृत्यू हे महाराष्ट्र राज्यात झाले आहेत. तर तामिळनाडूमध्ये 7 हजार 50, कर्नाटकात 5 हजार 368, दिल्लीमध्ये 4 हजार 389, उत्तर प्रदेशात 3 हजार 294 आणि पश्चिम बंगालमध्ये 3 हजार 73 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मिझारोमध्ये आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसून 494 सक्रिय रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details