नवी दिल्ली - सिंगापूरच्या उच्च न्यायालयाने पळपुटा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबीयांची बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत. सिंगापूरमधील या खात्यांमध्ये ४४.४१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ईडीच्या शिफारशीनुसार भारतातील अवैध संपत्ती प्रकरणातील चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. नीरव मोदी भारतातील १३ हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे.
नीरव मोदीसह कुटुंबीयांची सिंगापूरमधील बँक खाती गोठवली
ही बँक खाती ब्रिटिश व्हर्जिन आयलंड येथील पॅव्हिलियन पॉईंट कॉर्पोरेशनच्या नावावर आहेत. ही कंपनी नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदी आणि तिचा पती मयंक मेहता यांच्या नावावर आहे. हे दोघेही लंडनमध्ये बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी असून भारत त्यांच्याही प्रत्यर्पणासाठी प्रयत्नशील आहे.
ही बँक खाती ब्रिटिश व्हर्जिन आयलंड येथील पॅव्हिलियन पॉईंट कॉर्पोरेशनच्या नावावर आहेत. ही कंपनी नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदी आणि तिचा पती मयंक मेहता यांच्या नावावर आहे. हे दोघेही सध्या लंडनमध्ये बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी असून भारत त्यांच्याही प्रत्यर्पणासाठी प्रयत्नशील आहे.
याआधी काही दिवसांपूर्वी नीरव मोदी आणि पूर्वी मोदी यांची स्वीस बँकांमधील खाती गोठवण्यात आली होती. या खात्यांमध्ये २८३.१६ कोटी रुपयांची ठेव आहे. आतापर्यंत ईडीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित ५ बँक खाती गोठवण्यात आली आहेत. पीएमएलए कायद्याच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे.