ननकाना देव दरबार गुरुद्वारा हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत पाकिस्तानी दूतावाराबाहेर आंदोलन - ननकाना साहिब दगडफेक
पाकिस्तानमधील शीखांचे पवित्र स्थळ ननकाना देव दरबार गुरुद्वारा येथे काही कट्टरतावाद्यांनी हिंसक आंदोलन केले. या घटनेच्या विरोधात दिल्लीत पाकिस्तानी दूतावासाबाहेर आंदोलन सुरू आहे.
दिल्लीत पाकिस्तानी दुतावाराबाहेर आंदोलन
नवी दिल्ली - पाकिस्तानमधील शीखांचे पवित्र स्थळ ननकाना देव दरबार येथे काही कट्टरतावाद्यांनी हिंसक आंदोलन केले. या घटनेच्या विरोधात शीख अकाली दल आणि शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पाकिस्तानी दूतावासाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शीख बांधवांनी सहभाग घेतला आहे.