वॉशिंग्टन डी. सी - भारतातील केरळ आणि कर्नाटक राज्यात लक्षणीय प्रमाणात इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी पसरले असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे. यासंबंधी नुकताच एक अहवाल युएनने जाहीर केला आहे. याबरोबरच अल- कायदा या दहशतवादी संघटनेत 150 ते 200 दहशतवादी भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार या देशातील असून भारतीय उपखंडात हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा इशारा अहवालातून दिला आहे.
ISIS चे दहशतवादी केरळ आणि कर्नाटकात.. संयुक्त राष्ट्राचा अहवाल
इसिसचे अनेक दहशतवादी केरळ आणि कर्नाटक राज्यात आहेत, असे अहवालात म्हटले आहे. मागील वर्षी भारतात दहशतवाद्यांचा नवा प्रदेश (प्रांत) तयार केल्याचे इसिसने म्हटले होते.
भारतीय उपखंडात अल-कायदा तालिबान्यांच्या छत्राखाली काम करत असून अफगाणिस्तानातील निमरुझ, कंदाहार आणि हेलमांद या भागातून आपल्या करावाया करत आहे. आपल्या दीडशे ते दोनशे दहशतवाद्यांद्वारे हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सद्य स्थितीत भारतीय उपखंडात अल कायदाचा नेता उस्मान महमूद हा आहे. आधीचा संघटनेचा नेता असिम उमर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचे अहवालात म्हटले आहे.
इसिसचे अनेक दहशतवादी केरळ आणि कर्नाटक राज्यात आहेत, असे अहवालात म्हटले आहे. मागील वर्षी भारतात दहशतवाद्यांचा नवा प्रदेश(प्रांत) तयार केल्याचे इसिसने म्हटले होते. काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी कारवाया वाढविण्यात आल्यानंतर इसिसने ही घोषणा केली होती. भारतात कार्यरत असलेल्या या दहशतवादी गटाचे नाव ‘विलायाह हिंद’ असे असल्याचे इसिसने जाहीर केले होते. मात्र, काश्मीरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा दावा फेटाळून लावला आहे.