अहमदाबाद - 'लोकांची पोटे रिकामी असताना त्यांना योग करायला लावता. खिसा रिकामा असताना त्यांना बँकेची खाती उघडायला लावता, हीच काय तुमची राष्ट्रभक्ती?' अशा शब्दात पंजाबचे मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
रिकाम्या पोटी योग; खिसा रिकामा असताना बँक खाती, ही तुमची राष्ट्रभक्ती? - सिद्धू - Yoga
सिद्धू यांच्या बोलण्यावर सोशल मीडियावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नवज्योत सिंग सिद्धू
गुजरातच्या अहमदाबादमध्ये प्रचार रॅलीत ते बोलत होते. सिद्धू म्हणाले, 'रिकाम्या पोटी तुम्ही लोकांना योगासने करायला लावता. नरेंद्र मोदी, हीच काय तुमची राष्ट्रभक्ती आहे? आता सर्वांना रामदेव बाबाच बनवून टाका,' असा टोमणा सिद्धू यांनी मारला आहे. सिद्धू यांच्या बोलण्यावर सोशल मीडियावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.