महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटक पोटनिवडणूक निकाल : भाजपचा विजय, सिद्धरामय्या यांनी दिला पक्षनेते पदाचा राजीनामा - Siddaramaiah resignation to Sonia Gandhi

काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपद आणि विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

सिद्धरामय्या
सिद्धरामय्या

By

Published : Dec 9, 2019, 7:16 PM IST

नवी दिल्ली -कर्नाटकमधील 15 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीचा निकालाची मतमोजणी आज पार पडली. या पोटनिवडणुकीतील भाजपने विजय प्राप्त केला आहे. यावर काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपद आणि विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.


मी जनतेच्या मतांचा आदर करतो. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्षनेते पदाचा राजीनामा पाठवला आहे, असे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी सांगितले.


कर्नाटकातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपने 15 पैकी 12 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला 2 जागांवरच विजय मिळवता आला आहे. एक जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे.


कर्नाटकमध्ये याआधी निवडून आलेले काँग्रेस-जेडीएस सरकार हे १७ आमदारांच्या राजीनाम्यामुळे, अवघ्या तेरा महिन्यातच कोसळले होते. बहुमताअभावी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते.

त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात असा निर्णय दिल्यानंतर त्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सर्व आमदारांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details