पणजी - गतवेळी मिळालेल्या मताधिक्यापेक्षा यावेळी अधिक मताधिक्य मिळेल, तसेच मला विजयाची खात्री असून घोडामैदान जवळच आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली.
गतवेळी मिळालेल्या मताधिक्यापेक्षा यावेळी अधिक मते मिळतील - श्रीपाद नाईक - North Goa
भाजपचे उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार श्रीपाद नाईक मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत.

श्रीपाद नाईक
श्रीपाद नाईक
उत्तर गोवा लोकसभा मतदासंघाची मतमोजणी सुरू आहे. यासाठी नाईक मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. दरम्यान, गोव्यात लोकसभा आणि तीन विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. तर पणजी विधानसभा मतदारसंघासाठी वेगळी निवडणूक घेण्यात आली होती. त्यामुळे प्रथम विधानसभा आणि त्यांंतर लोकसभा मतमोजणी होईल. त्यामुळे पणजी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रथम सुरु आली आहे. पहिल्या फेरीत सुरुवात झाली असून काँग्रेस आघाडीवर आहे.