महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मंगळूरजवळ रुळावरून घसरली श्रमिक विशेष रेल्वे - मंगळूर रेल्वे अपघात

मजुरांना घेऊन जाणारी श्रमिक ट्रेन कर्नाटकच्या मंगळूरजवळील पाडील येथे रुळावरून घसरली.

मंगळूरजवळ रुळावरून घसरली श्रमिक विशेष रेल्वे
मंगळूरजवळ रुळावरून घसरली श्रमिक विशेष रेल्वे

By

Published : May 19, 2020, 12:03 PM IST

Updated : May 19, 2020, 1:25 PM IST

मंगळूर(कर्नाटक) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यातील स्थलांतरीत मजूर देशभरात अडकून पडले आहेत. या मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी प्रत्येक राज्यातून श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. अशाच मजुरांना घेऊन जाणारी श्रमिक ट्रेन कर्नाटकच्या मंगळूरजवळील पाडील येथे रुळावरून घसरली.

ही घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही रेल्वे तिरुवूर येथून राजस्थानच्या जयपूरला जात होती. मात्र पाडीलजवळ रुळावरून घसरली. या रेल्वेतील प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेने पहाटे साडेचार वाजता रवाना करण्यात आले.

Last Updated : May 19, 2020, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details