महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हैदराबादमध्ये होणार प्रभासच्या ‘सलार’ चा मुहूर्त! - हैदराबाद सलार’ या नवीन चित्रपट

प्रभासचा ‘राधे श्याम’ जवळपास पूर्ण झाला असून तो ‘सलार’ या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सज्ज होतोय. १५ जानेवारीला पारंपरिक पूजा करून त्याच्या मुहूर्ताचा नारळ फोडण्यात येणार आहे.

प्रभासच्या ‘सलार’ चा मुहूर्त!
प्रभासच्या ‘सलार’ चा मुहूर्त!

By

Published : Jan 14, 2021, 8:18 PM IST

हैदराबाद - ‘बाहुबली’च्या तुफान यशानंतर अभिनेता प्रभासच्या चित्रपटांची वाट पहिली जाते. त्याचा ‘राधे श्याम’ जवळपास पूर्ण झाला असून तो ‘सलार’ या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सज्ज होतोय. १५ जानेवारीला पारंपरिक पूजा करून त्याच्या मुहूर्ताचा नारळ फोडण्यात येणार आहे. होम्बल फिल्म्स ही निर्मितीसंस्था, दिग्दर्शक प्रशांत नील आणि प्रेक्षकप्रिय अभिनेता प्रभास हे चित्रपटासाठी एकत्र येणे म्हणजे ‘सिनेमॅटिक पॉवरहाऊस’ योग. हा अ‍ॅक्शन चित्रपट असून मनोरंजनाची ग्वाही असल्याचे बोलले जात आहे.

प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता प्रभास पहिल्यांदाच एक हिंसक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, सूत्रांच्या माहितीनुसार या भूमिकेसाठी प्रभास मोठ्या प्रमाणात वजन वाढवणार असल्याचेही समजतेय. तसेच 'सलार'च्या शूटिंगला जानेवारीच्या शेवटी सुरुवात करणार आहे. म्हणूनच 15 जानेवारीला हैदराबादला मुहूर्त करण्यात येणार असून चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित राहणार आहे. आमंत्रित केलेल्या प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. अश्वथनारायण सी.एन., कर्नाटकचे उपमुख्यमंत्री, चित्रपट निर्माते एस.एस. राजामौली आणि अभिनेता यश आहेत. याबद्दल बोलताना प्रभास म्हणाला, "हैदराबादमध्ये मुहूर्त पूजनानंतर चित्रपटाचे शूट सुरू करुन मी चाहत्यांना माझा 'सलार' मधील लूक दर्शवण्यासाठी खूप उत्साही आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details