नवी दिल्ली -कोणतीही व्यक्ती सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करताना आढळल्यास त्यांना जागीच गोळ्या घालण्यात याव्या, असे जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाला आपण सांगितले आहे. त्यामुळे, कोणत्याही प्रकारचे आंदोलन करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा विचार आंदोलकांनी करू नये, असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगदी यांनी मंगळवारी केले. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांबाबत ते बोलत होते.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना जागीच गोळ्या घाला; केंद्रीय मंत्र्यांचा 'आदेश'! - सुरेश अंगदी शूट अॅट साईट
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करताना कोणी आढळल्यास त्यांना जागीच गोळ्या घालण्यात याव्या, असे जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाला आपण सांगितले आहे. त्यामुळे, कोणत्याही प्रकारचे आंदोलन करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा विचार आंदोलकांनी करू नये, असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगदी यांनी मंगळवारी केले.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना जागीच गोळ्या घाला; केंद्रीय मंत्र्याचा 'आदेश'!
रेल्वे स्वच्छ ठेवण्यासाठी, वेळेत पोहोचवण्यासाठी आणि रेल्वेच्या विकासासाठी १३ लाख कर्मचारी दिवस-रात्र काम करतात. मात्र, काही समाजविरोधी घटक विरोधी पक्षाच्या मदतीने देशात अशांतता माजवत आहेत. केवळ देशामध्ये अनागाेंदी माजावी, आणि देशाची अर्थव्यवस्था कोडमलून पडावी या उद्देशाने काही लोक हे आंदोलन करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा : आज ठरणार जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींचे भवितव्य!