नवी दिल्ली -दहशतवादाला सातत्याने प्रोत्साहन केल्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) एशिया पॅसिफिक ग्रुपच्या APG गटाने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी FATF ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं होतं.
पाकला धक्का : टेरर फंडिंग प्रकरणी FATF ने टाकले काळ्या यादीत - Shock to Pakista
दहशतवादाला सातत्याने प्रोत्साहन केल्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) एशिया पॅसिफिक ग्रुपच्या APG गटाने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे.
आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याशी संबंधित ४० निकषांपैकी ३२ निकष पाकिस्तानने पूर्ण केले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची ग्रे यादीतून काळ्या यादीत घसरण झाली आहे. आधीच कर्जाचा डोंगर असलेल्या पाकिस्तानला ऑक्टोबर २०१९ पर्यंत काळ्या यादीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतो याचे पुरावे भारताने वेळोवेळी दिले आहेत. मात्र, पाकिस्तान नेहमीच खोटे बोलत आला आहे.