भोपाळ - कोरोनाचे संकट असतानाही मध्य प्रदेशमध्ये सत्तानाट्य घडले आणि कमलनाथ यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले. परिणामी भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काँग्रेसचे आमदार फुटल्यामुळे त्यांच्या जागी पुन्हा पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी मोठा डाव टाकला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह यांच्या मेव्हण्याला कमलनाथ यांनी मध्य प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांची मोठी खेळी - मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणूक 2020
शिवराज सिंह यांचे मेहुणे संजय सिंह मसानी यांना जबाबदारी देऊन कमलनाथ यांनी पोटनिवडणूकीची जय्यत तयारी करत असल्याचे दाखवून दिले आहे. मसानी यांना विधानसभा पोटनिवडणूक समन्वयक आणि प्रभारी पदाची सुद्ध जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवराज सिंह यांचे मेहुणे संजय सिंह मसानी यांना जबाबदारी देऊन कमलनाथ यांनी पोटनिवडणूकीची जय्यत तयार करत असल्याचे दाखवून दिले आहे. मसानी यांना विधानसभा पोटनिवडणूक समन्वयक आणि प्रभारी पदाची सुद्ध जबाबदारी देण्यात आली आहे. मसानी यांना कमलनाथ यांनी 2018 ला काँग्रेसमध्ये सहभागी करून त्यांना काँग्रेसकडून विधानसभेचे तिकीट दिले होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागल होता.
काँग्रेस प्रवक्ते अजय सिंह यांनी सांगितले की, मसानी हे योग्य आणि कर्तबगार नेते आहेत. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे मध्य प्रदेश काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा झाला होता. नुकतीच त्यांना पोटनिवडणुकीची जबाबदारी दिल्यामुळे काँग्रेसला आणखी फायदा होणार आहे.