नवी दिल्ली -ज्योतिरादित्य सिंधियासह काँग्रेसचे 22 आमदार हे भाजपात गेल्याने कमलनाथ सरकार कोसळले आणि प्रदेशतील भाजपचे संख्याबळ वाढले आहे. त्यानुसार आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते शिवराज सिंह चौहान शपथ घेणार आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान घेणार शपथ - #MadhyaPradesh
आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते शिवराज सिंह चौहान शपथ घेणार आहेत.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे नाव आघाडीवर होते. पण, भाजप आमदारांच्या गोटातून शिवराज यांच्या नावाला पंसती मिळत असल्याचे समजते. आज रात्री 9 वाजता शपथविधी पार पडणार आहे.
काँग्रेसवर नाराज असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या 22 आमदारांनीही राजीनामा दिला. काँग्रेसकडून आमदारांना परत आण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आमदारांचा पाठिंबा न मिळाल्याने कमलनाथ यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. तर काँग्रेसच्या बंडखोर 22 आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.