नवी दिल्ली - राजकीय उलथापालथीनंतर अखेर आज भाजपचे वरिष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवराजसिंह चौहान यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
मध्य प्रदेश : शिवराजसिंह चौहान यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शिवराजसिंह चौहान यांनी चौथ्यांदा शपथ घेतली आहे.
काँग्रेसवर नाराज असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या 22 आमदारांनीही राजीनामा दिला. काँग्रेसकडून आमदारांना परत आण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आमदारांचा पाठिंबा न मिळाल्याने कमलनाथ यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. काँग्रेसच्या बंडखोर 22 आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
2005 पासून 2018 पर्यंत सलग 13 वर्ष शिवराज सिंह मुख्यमंत्री होते. आज चौथ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये अर्जुन सिंह आणि श्यामचरण शुक्ल यांनीही 3 वेळा मुख्यमंत्री पद भूषवले होते.