भोपाळ - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर जोरदार निशाणा लगावला आहे. जोपर्यंत कमलनाख यांच्या अत्याचार, भ्रष्टाचार आणि दहशतीच्या लंकेचे दहन होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नसल्याचे शिवराजसिंह चौहान म्हणाले.
'कमलनाथांच्या अत्याचार आणि दहशतीचे दहन होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही'
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर जोरदार निशाणा लगावला आहे. जोपर्यंत कमलनाख यांच्या अत्याचार, भ्रष्टाचार आणि दहशतीच्या लंकेचे दहन होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नसल्याचे शिवराजसिंह चौहान म्हणाले.
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे मध्य प्रदेशमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात शिवराजसिंह बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा लगावला. काँग्रेसकडून चार वेळा खासदार आणि दोनदा केंद्रीय मंत्री राहिलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कमलनाथ सरकार संकटात सापडले आहे. कारण सिंधिया यांच्याबरोबर २२ आमदारांनी राजीनामे दिले आहेत.