भोपाळ-मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी विजेच्या मुद्द्यावरून रविवारी भोपाळमध्ये काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ 'कंदील मोर्चा' काढला. राज्यात विजेच्या तुटवडा निर्माण होण्यास मुख्यमंत्री कमल नाथ आणि काँग्रेस नेते दिग्विजयसिंग जबाबदार असल्याचा आरोप चौहान यांनी यावेळी केला. या मोर्चामध्ये चौहान यांच्यासोबत इतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
मध्यप्रदेश : शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारविरोधात 'कंदील मोर्चा' - undefined
राज्यात विजेच्या तुटवडा निर्माण होण्यास मुख्यमंत्री कमल नाथ आणि काँग्रेस नेते दिग्विजयसिंग जबाबदार असल्याचा आरोप चौहान यांनी यावेळी केला. या मोर्चामध्ये चौहान यांच्यासोबत इतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
''राज्यात काँग्रेस सत्तेत आल्यापासून विजेची समस्या गंभीर बनत चालली आहे. दिग्विजयसिंग यांनी मध्यप्रदेशाला काळोखात नेले आहे आणि पुन्हा राज्यात एकदा अंधारयुग सुरू झाले आहे. कंदील हा या अंधार युगाचे प्रतिक असल्यानेच जनतेला जागरुक करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे" असे चौहान यांनी यावेळी सांगितले.
चव्हाण यांनी शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टिका केली. राज्यात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर दोन तासांत कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, आता कर्जमाफीवरून काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आणि मुख्यमंत्री कमल नाथ हे वेगवेगळी वक्तव्य करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही चौहान यांनी यावेळी केला.
TAGGED:
jagdish