भोपाळ -अभिनेत्री विद्या बालनच्या शेरनी चित्रपटाचे चित्रीकरण मंत्री विजय शाह यांच्या इशाऱ्यानंतर थांबवण्यात आले आहे. विजय शाह यांचे जेवणाचे आमत्रंण नाकारल्यामुळे चित्रीकरण थांबवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, उच्च अधिकाऱ्यांपर्यंत प्रकरण पोहचल्यानंतर पुन्हा चित्रीकरण सुरू झाले. यावरून काँग्रेस नेत्यांनी भाजपावर टीका केली असून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी विद्या बालन यांची माफी मागावी, असे म्हटलं आहे.
विद्या बालनच्या शेरनी चित्रपटाचे चित्रीकरण बालाघाटमध्ये सुरू होते. त्यासाठी 20 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत परवानगी घेतली होती. याचदरम्यान विजय शाह यांनी विद्या बालन यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी 8 नोव्हेंबरला सकाळी 11 ते 12 दरम्याची वेळ ठरली होती. त्यानंतर शाह यांना चार वाजता महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जायचे होते. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे ते भरवेली खदानच्या विश्रामगृहात थांबले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ते विद्या बालनची भेट घेण्यासाठी पोहचले.