पणजी - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 'राहुल सध्या रणछोडदास गांधी बनलेत,' असे म्हणत राहुल गांधींची खिल्ली उडवली. 'राहुल गांधी आर्टिकल ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर काही बोलतील, अशी अपेक्षाच मी करत नाही. ते सध्या रणछोडदास गांधी बनलेत,' असे चौहान यांनी म्हटले.
राहुल गांधी बनलेत 'रणछोडदास गांधी' - शिवराज सिंह चौहान - goa news
काँग्रेस पक्ष बाजूला पडत चालला आहे. मॅडम (सोनिया गांधी) आणि राहुल गांधी यांच्याजवळ आतापर्यंत काहीच नाही. मी सोनिया गांधींनी आर्टिकल ३७० विषयी त्यांची भूमिका मांडावी, अशी मागणी करतो,' असे चौहान म्हणाले.
काँग्रेस पक्ष बाजूला पडत चालला आहे. मॅडम (सोनिया गांधी) आणि राहुल गांधी यांच्याजवळ आतापर्यंत काहीच नाही. मी सोनिया गांधींनी आर्टिकल ३७० विषयी त्यांची भूमिका मांडावी, अशी मागणी करतो,' असे म्हणत चौहान यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. 'राहुल गांधींनी यावर बोलावे, अशी अपेक्षाच मी करत नाही. ते रणछोडदास गांधी बनले आहेत. निवडणुकीतील पराजयानंतर पक्षाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्ष मजबूत बनवण्याचे काम करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी असे केले नाही,' असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. सध्या सोनिया गांधींनी पक्षाचा हंगामी पदभार स्वीकारला आहे.
दरम्यान, ५ ऑगस्टला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखला दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर राहुल गांधींनी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसक घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. तसेच, त्यांनी पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील स्थितीविषयी माहिती द्यावी, असे म्हटले होते.