नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मंत्री इमरती देवीवर आक्षेपार्ह टीपण्णी केली. यावरुन येथील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहले असून कमलनाथ यांना पक्षातून काढून टाकावे, अशी मागणी केली आहे.
कमलनाथ यांची टीपण्णी चुकीची आहे, असे जर सोनिया गांधींना वाटत असेल. तर त्यांनी कमलनाथ यांच्यावर कारवाई करायला हवी. सोनिया गाधींनी कोणतीच कारवाई केली नाही, तर काँग्रेस आणि सोनिया गांधींचे कमलनाथ यांना समर्थन आहे, असे स्पष्ट होईल, असे शिवराज सिंह म्हणाले.