भोपाळ(मध्य प्रदेश)- शिवराजसिंह चौहान सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अनेक दिवसांपासून लांबणीवर होता. मात्र, आज मंत्रिमंडळ विस्ताराचा योग आला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी सकाळी 11 वाजता राजभवनात नवनिर्वाचित नेत्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांचे वर्चस्व राहिले. सिंधिया यांनी भाजपच्या हाय कमांडला भेट देऊन आपल्या समर्थकांना मंत्री बनविण्याची मागणी केली होती, असेही बोलले जात आहे.
शिवराजसिंह सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांचे वर्चस्व - शिवराज मंत्रिमंडल का हुआ विस्तार
बहुप्रतिक्षित शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी राजभवनात नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शिवराजसिंह सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
या 28 नेत्यांनी घेतली शपथ..
- गोपाल भार्गव
- विजय शाह
- जगदीश देवडा
- यशोधरा राजे सिंधिया
- भूपेंद्र सिंह
- एदलसिंह कंषाना
- बृजेंद्र प्रताप सिंह
- विश्वास सारंग
- इमरती देवी
- प्रभुराम चौधरी
- महेंद्र सिंह सिसौदिया
- प्रद्युम्न सिंह तोमर
- प्रेम सिंह पटेल
- ओमप्रकाश सकलेचा
- उषा ठाकुर
- अरविंद भदौरिया
- डॉ. मोहन यादव
- हरदीप सिंह डंग
- राजवर्धन सिंह दत्तीगांव
- भारत सिंह कुशवाहा
- इंदर सिंह परमार
- रामखेलावन पटेल
- राम (नानो) किशोर कांवरे
- बृजेन्द्र सिंह यादव
- गिर्राज डण्डौतिया
- सुरेश धाकड
- ओ.पी.एस भदौरिया
- बिसाहूलाल साहू