महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशच्या उसेन बोल्टला क्रीडा मंत्रालय करणार मदत; पाहा व्हिडिओ - मध्यप्रदेशचा उसेन बोल्ट

शिवपुरी जिल्ह्यातील नरवर येथील रहिवाशी रामेश्वर गुर्जरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात अवघ्या 11 सेकंदात तो 100 मीटरचा पल्ला गाठताना दिसत आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी या व्हिडिओला आपल्या सोशल मिडिया वरून प्रदर्शित करत मुख्यमंत्री कमलनाथ यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

मध्यप्रदेशचा उसेन बोल्ट

By

Published : Aug 18, 2019, 6:17 PM IST


शिवपुरी- काही दिवसांपुर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओतील 19 वर्षीय धावपटू रामेश्वर गुर्जरला आता मध्यप्रदेश क्रीडा मंत्रालय मदत करणार आहे. क्रिडामंत्री जितू पटवारी यांनी त्याला पुढील प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. जितू यांच्या म्हणण्यानुसार जर एखाद्याकडे कौशल्य आणि क्षमता असेल तर क्रिडामंत्रालय कायम त्याच्या पाठीशी असेल.

मध्यप्रदेशचा उसेन बोल्ट; व्हिडिओ व्हायरल

शिवपुरी जिल्ह्यातील नरवर येथील रहिवाशी रामेश्वर गुर्जरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात अवघ्या 11 सेकंदात तो 100 मीटरचा पल्ला गाठताना दिसत आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी या व्हिडिओला आपल्या सोशल मिडिया वरून प्रदर्शित करत मुख्यमंत्री कमलनाथ यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. क्रीडामंत्री जितू पटवारी यांनी व्हिडिओ पाहिल्यावर रामेश्वरला भोपाळ येथे भेटण्यासाठी आमंत्रित केले. केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनीही यापुर्वीच रामेश्वरवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.


सरकारकडून मदत मिळाल्यावर देशासाठी पदक जिंकायचं रामेश्वरचं स्वप्न आहे. 'सरकारने मला चांगलं प्रशिक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. प्रशिक्षण मिळाल्यावर मात्र मी सरकारच्या विश्वासाला साजेशी कामगिरी करेन' असा त्याचा आशावाद आहे. पुरेशा सोयीसुविधा नसतानाही रामेश्वर, उसेन बोल्टच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. बोल्टने 100मीटर शर्यत 9.58 सेकंदात पुर्ण केली आहे. रामेश्वरने माञ कुठल्याही सुविधांअभावी 10.16 सेकंदातच 100मीटर अंतर पार केले आहे. शिक्षक असलेल्या रामेश्वरच्या कोचचं म्हणणं आहे की, रामेश्वर देशासाठी नक्कीच गर्वाचे क्षण आणणार. पुढे ते म्हणाले, मी जेव्हा रामेश्वरला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्याच्याकडे पायात घालायला जोडे देखील नव्हते. जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

ABOUT THE AUTHOR

...view details