इटावा (उत्तर प्रदेश) -प्रगतिशील समाजवादी पक्षचे (प्रसपा) प्रमुख शिवपाल सिंह यादव यांनी 2022 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी समावादी पक्ष (सपा) तसेच समाजवाद्यांनी मिळून युती करावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर जनता जो निर्णय करेल त्याचा सन्मान करु, असे ते म्हणाले.
इटावा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये समाजवादी कार्यकर्त्यांचेही योगदान असून डॉ. राम मनोहर लोहिया यांनी या लढ्यात मोठे योगदान दिले.
यावेळी ते भाजपवर निशाणा साधत म्हणाले, राज्य व केंद्र सरकार जनतेचे शोषण करत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यात सर्वजण एकत्रित आले होते. त्याप्रमाणेच आता भाजपच्या विरोधात सर्व समाजवाद्यांना एकत्रित यायचे आहे. ही लोकशाहीची लढाई लोकलाही पद्धतीने आपल्याला जिंकायची आहे.