वाराणसी - भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांचा आकडा ६० जवळ आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी वाराणसीमधील प्रल्हादेश्वर मंदिरातील शिवलिंगालाच चक्क मास्क घातला आहे.
प्रल्हादेश्वर मंदिरातील शिवलिंगाला मास्क लावलण्यात आले आहे. 'कोरोना विषाणू देशभर पसरत आहे. आम्ही हे मास्क लोकांना जागृत करण्यासाठी शिवलिंगाला घातले आहे', असे मंदिरातील पुजारीने सांगितले. तसेच कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी पुजारीने मंदिरात येणाऱ्या भाविकांनी शिवलिंगाला स्पर्श करण्यास मनाई केली आहे. तर मंदिरातील पुजारी आणि भक्तींनी मास्क घालून पूजा केली आहे. दरम्यान शिवलिंगाला मास्क घातलेले छायाचित्र सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.