महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा उपाध्यक्षपदावर शिवसेनेचा हक्क - संजय राऊत - loksabha

मोदींच्या या मंत्रीमंडळात  १८ खासदार असलेल्या शिवसेनेला केवळ १ मंत्रीपद देण्यात आले आहे.

संजय राऊत

By

Published : Jun 6, 2019, 11:30 AM IST

Updated : Jun 6, 2019, 11:45 AM IST

मुंबई - १७ व्या लोकसभेच्या उपाध्यक्षपदाची मागणी शिवसेनेद्वारे करण्यात आली आहे. ही आमची मागणी नसून आमचा नैसर्गीक दावा आणि हक्क आहे. हे पद शिवसेनेलाच मिळाले पाहिजे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपसह घटकपक्षांच्या रालोआ आघाडीने ३५० पेक्षा जास्त जागांवर बहुमत मिळवले आहे. मोदींच्या नेतृत्वातील या लोकसभेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची अजून निवड झाली नाही. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेत मंत्रीमंडळाचे खातेवाटप केले आहे. मोदींच्या या मंत्रीमंडळात १८ खासदार असलेल्या शिवसेनेला केवळ १ मंत्रीपद देण्यात आले. त्यांनतर आता लोकसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची निवड करण्यात येईल. लोकसभेच्या उपाध्यक्ष पदावर शिवसेने दावा केला आहे.

एकच मंत्रीपद मिळाल्याने शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा होती. मात्र, आतातरी मोदी लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेच्या पदरात टाकतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Last Updated : Jun 6, 2019, 11:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details