महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मेहबूबा मुफ्तींना मनोरुग्णालयात पाठवण्याची गरज - संजय राऊत - twitter

'पाकिस्तानने तर हिरवी जर्सी परिधान केली होती. मग ते का हरले?' असा सवाल राऊत यांनी मेहबूबा यांना केला आहे. तर, भाजप नेते रामचंद्र राव यांनी मुफ्ती यांची टिप्पणी 'मूर्खपणाची आणि फुटीरतावादी वृत्तीची' असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत

By

Published : Jul 1, 2019, 7:54 PM IST

नवी दिल्ली - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पीडीपी नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींना मनोरुग्णालयात पाठवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मेहबूबा यांनी 'भारतीय क्रिकेट संघाने भगवी जर्सी घातल्याने त्यांना इंग्लंडकडून पराजय पत्करावा लागला,' असे वक्तव्य केले होते. यानंतर भाजप नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

'पाकिस्तानने तर हिरवी जर्सी परिधान केली होती. मग ते का हरले?' असा सवाल राऊत यांनी मेहबूबा यांना केला आहे. 'मला अंधश्रद्धाळू म्हणा. पण टीम इंडियाची विश्व करंडकातील विजयी घोडदौड त्या जर्सीनेच रोखली,' असे ट्विट मेहबूबा यांनी केले होते. यानंतर मेहबूबा काही कारण नसताना राजकीय वाद निर्माण करत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.

'भगव्या क्रिकेट जर्सीवरून मेहबूबा कारण नसताना वाद निर्माण करत आहेत. भगवा हाही आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तो राष्ट्रध्वजातील एक रंग आहे. भारत पुन्हा विश्व करंडक जिंकून आणणार, याची मला खात्री आहे,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

भाजप नेते रामचंद्र राव यांनी मुफ्ती यांची टिप्पणी 'मूर्खपणाची आणि फुटीरतावादी वृत्तीची' असल्याचे म्हटले आहे. 'भारतीय संघाच्या जर्सीच्या रंगीचा पराजयाशी संबंध जोडू पाहणाऱ्या मुफ्ती फुटीरतेला पाठिंबा देणाऱया नेत्यांप्रमाणे बोलत आहेत. या मूर्खासारख्या टिप्पणीतून त्यांचा सांप्रदायिकतावादाचा सूर दिसत आहेत. तसेच, यातून देश आणि इथल्या भारतीय संस्कृतीविषयीचा तिरस्कारही दिसत आहे,' असे ते म्हणाले.

'एक माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ राजकीय नेत्या भारताचा जय-पराजय जर्सीच्या रंगामुळे झाल्याचे म्हणत आहेत, हे आश्चर्यकारक आहे. देशाच्या राष्ट्रध्वजात असलेल्या भगव्या रंगाचे राजकारण का केले जात आहे,' असा प्रश्न भाजप प्रवक्ते नितीन कोहली यांनी केला आहे.

भगव्या जर्सीवरून मागील ४ दिवसांपासून वाद सुरू आहे. भारताच्या इंग्लंडविरोधातील पराजयानंतर अनेकांनी सोशल मीडियावर भगवी जर्सी भारतासाठी 'अनलकी' ठरल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details