मुंबई-सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात आपले उमेदवार उतरवले आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेनेने आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना २३ जागा लढवणार आहे. तर बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान २८ तारखेला पार पडणार आहे.
पहिल्या टप्प्यात तीन जागेवर शिवसेनेचे उमेदवार-
बिहार निवडणुकांचे मतदान हे तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान २८ तारखेला पार पडणार आहे. या टप्प्यात शिवसेना ३ मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानात 3 नोव्हेंबरला होणार आहे. यामध्ये शिवसेनेचे 9 उमेदवार आणि शेवटच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे, या टप्प्यात शिवसेनेने 11 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांची उद्या(मंगळवारी) पाटण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच आता बिहारमध्ये शिवसेना निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यानंतर तेथील उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून खासदार अनिल देसाई, कृपाल तुमाने आणि माजी खासदार-नेते चंद्रकांत खैरे हे बिहारला जाणार आहेत.
शिवसेना उमेदवारांची यादी-
पहिला टप्पा*
मनीष कुमार - पालीगंज
ब्युटी सिन्हा - गया शहर
मृत्युंजय कुमार - वजीरगंज
दुसरा टप्पा-
संजय कुमार - चिरैय्या
संजय कुमार - फुलपराश
संजय कुमार झा - बेनीपूर
रंजय कुमार सिंह - तरैय्या
विनिता कुमारी - अस्थवां
रवींद्र कुमार - मनेर