नवी दिल्ली -कर्नाटकातील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. यासंबधी शिवकुमार चौकशीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. 'मी कोणतेही बेकायदेशीर काम केले नसून मला त्रास देण्यासाठी भाजप हे सर्व करत आहे. त्यांना याचा आनंद घेऊ द्या', असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा - INX प्रकरण : पी. चिदंबरम यांची सीबीआय कोठडी आज संपणार; न्यायालयात हजर करण्याची शक्यता
मी न्यायालयाला विनंती केली होती, की हे एक साधे आयकर प्रकरण असून मी यापुर्वीच आयकर दाखल केले आहे. यामध्ये कुठलाही आर्थिक गैरव्यवहार नाही. मात्र, काल (गुरुवारी) त्यांनी मला समन्स पाठवले. मी न्यायालयाचा आदर करतो. आज दुपारी मी दिल्लीला रवाना होईल आणि चौकशीमध्ये पुर्ण सहकार्य करेल', असे शिवकुमार म्हणाले.
हे ही वाचा - राष्ट्रीय तपास संस्थेचे कोईम्बतूरमध्ये 5 ठिकाणी छापे, लॅपटॉप-मोबाइल फोन जप्त