नवी दिल्ली - केंद्र सरकारने नुकतेच तीन कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्यास शिरोमणी अकाली दल या भाजपच्या सहकारी पक्षाने विरोध केला होता. पक्षाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मदभेदानंतर राजीनामा दिला आहे. मात्र, आता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच (एनडीए) बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे.
कृषी विधेयकावरील मतभेदानंतर शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर
शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किमती वैधानिकरित्या देण्यात यावी, अशी मागणी पक्षाने केली होती. मात्र, केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली नाही. कृषी विधेयकावरील मतभेदानंतर शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहे.
शिरोमणी अकाली दल
शेत मालाला किमान आधारभूत किमती कायदेशिररित्या देण्यात यावी अशी मागणी पक्षाने केली होती. मात्र, केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली नाही. तसेच पंजाबी आणि शीख प्रश्नांबाबत केंद्र सरकार असंवेदनशिलता दाखवत असल्याने म्हणत पक्ष एनडीएतून बाहेर पडला. हरसिमरत कौर बादल यांनी राजीमाना दिल्यानंतर आठवड्यानंतर पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिन्ही विधेयकांना विरोध दर्शवत कौर यांनी राजीनामा दिला होता.
Last Updated : Sep 26, 2020, 10:57 PM IST