मुंबई -दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक इक्बाल मिर्ची प्रकरणामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा यांची ईडीने बुधवारी तब्बल साडे नऊ तास चौकशी केली. त्यांना काही दिवसांपूर्वी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. यानुसार, कुंद्रा यांना 4 नोव्हेंबरपर्यंत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मुदत संपण्याआधीच कुंद्रा ईडी कार्यालयात हजर झाले.
शिल्पा शेट्टीच्या पतीची साडेनऊ तास 'ईडी'कडून चौकशी - raj kundra ed prob
इक्बाल मिर्ची प्रकरणात याआधी अटक करण्यात आलेल्या रणजीत सिंग बिंद्रा या आरोपीच्या जबानीतून कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. कुंद्रा याचे इक्बालसोबत संबंध असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे.
इक्बाल मिर्ची प्रकरणात याआधी अटक करण्यात आलेल्या रणजीत सिंग बिंद्रा या आरोपीच्या जबानीतून कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. कुंद्रा याचे इक्बालसोबत संबंध असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. 2011 मध्ये आर. के. डब्ल्यू नावाची कंपनी कुंद्रा यांनी विकत घेतली होती. याबरोबरच मुंबईतील विमानतळाजवळ एक भूखंडही कुंद्रा यांनी खरेदी केला होता. मात्र, या प्रकरणात आपले इक्बालसोबत कुठलेही संबंध नव्हते, असे म्हणत कुंद्रा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
ईडीकडून अटक करण्यात आलेल्या रणजीत बिंद्रा या आरोपीने इक्बालच्या जवळपास 225 कोटी रुपयांच्या संपत्तीचा व्यवहार घडवून आणला होता. यात कुंद्रा यांच्यासोबतही व्यवहार झाल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. कुंद्रा यांची इसेन्शियल हॉस्पिटॅलिटी ही कंपनी असून याच्या संचालक पदावर त्यांची पत्नी शिल्पा शेट्टी आहे. या कंपनीमध्ये बिंद्रा यानेही काही पैसे गुंतवले असल्याचे ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.