नवी दिल्ली - भाजपने दिल्लीतील ४ जागांवर उमेदवारांची घोषणा केल्यानंतर काँग्रेसनेही शेवटी आपले पत्ते खोलले आहेत. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आघाडीवर सर्वांच्या नजरा लागून होत्या. मात्र, काँग्रेसने ६ जागांवर आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम लागले आहे. विशेष म्हणजे ईशान्य दिल्लीच्या जागेवर चुरशीची लढत होणार आहे.
भाजपने रविवारी राजधानी दिल्लीतील ७ जागांपैकी चार जागांवर उमेदवार घोषित केले. त्यामध्ये सर्वांचे लक्ष ईशान्य दिल्लीच्या जागेवर लागलेले आहे. कारण येथून भाजपने प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना उमेदवरी जाहीर केली आहे. मात्र, काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर या जागेवरील लढत अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसने आज जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये तिवारी समोर मोठे आव्हान उभे केले आहे.