नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर निगमबोध घाटावर 3:58 वाजता अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी दीक्षित यांना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित होते.
शीला दीक्षित अनंतात विलीन; शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप - delhi
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निगमबोध घाटावर त्यांचा अंत्यविधी पार पडला आहे
शीला दीक्षित अनंतात विलीन
मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीक्षित यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या शीला दीक्षित देशातील पहिल्याच महिला आहेत.
Last Updated : Jul 21, 2019, 5:53 PM IST