ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शीला दीक्षित अनंतात विलीन; अंत्यसंस्कारापूर्वी पार्थिव अंतिम दर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात - दिल्ली

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित शनिवारी निधन झाले होते. रविवारी त्यांच्यावर शासकिय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अंत्यसंस्कारापूर्वी शीला दीक्षित यांचे पार्थिव '२४ अकबर रोड' येथील काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले होते.

त्यसंस्कारापूर्वी शीला दिक्षीत यांचे पार्थीव २४ अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले
author img

By

Published : Jul 21, 2019, 10:55 PM IST

Updated : Jul 22, 2019, 4:12 AM IST

दिल्ली- काँग्रेस प्रदेशाध्यक्षा आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे शनिवारी दुपारी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. रविवारी त्यांच्यावर शासकिय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अंत्यसंस्कारापूर्वी शीला दीक्षित यांचे पार्थीव काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. यामुळे शीला दीक्षित यांचे काँग्रेस अंतर्गत किती महत्वाचे स्थान होते हे दिसून आले आहे.

in article image
त्यसंस्कारापूर्वी शीला दिक्षीत यांचे पार्थीव २४ अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले

जो सन्मान पि. व्ही. नरसिंहराव यांना नाही तो शीला दीक्षित यांना

भारताचे माजी पंतप्रधान पि. व्ही. नरसिंहराव व माजी अध्यक्ष सिताराम केसरी यांचे पार्थीव देखील 24 अकबर रोड म्हणजे काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले नव्हते. परंतू शीला दीक्षित यांचे पार्थीव मात्र अंतिम अंतिम दर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले. शीला दीक्षित यांचे काँग्रेस अंतर्गत किती महत्वातचे स्थान होते हे यातून दिसून आले आहे.

काँग्रेसच्या पक्षाकडून राजकारणाला सूरूवात

शीला दीक्षित यांना राजकारणात आणले ते इंदिरा गांधी यांनी. १९८४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महिलांविषयक आयोगाकडे पाठवलेल्या भारताच्या प्रतिनिधी मंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. त्याच वर्षी त्या उत्तर प्रदेशमधील कन्नोज मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर राजीव गांधी मंत्रिमंडळात त्या संसदीय कामकाज राज्यमंत्री बनल्या.

काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ, वरिष्ठांसोबत वैयक्तिक संबंध

शीला दीक्षित हे नेहरू कुटुंब आणि सोबत काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ होत्या.शीला दीक्षित या दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. त्या काँग्रेसच्या सन्माननीय नेत्या होत्या. गांधी कुटुंबाचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळेच त्यांना २०१४ मध्ये केरळचे राज्यपाल करण्यात आले. मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला.

Last Updated : Jul 22, 2019, 4:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details