महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आजपर्यंत कोरोनासारखी महामारी पाहिली नाही, भारताच्या पहिल्या मतदाराची प्रतिक्रिया - himachal news

स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार श्याम सरन नेगी यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. ईटीव्हीसोबत त्यांनी खास बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, की माझे वय १०३ वर्ष आणि ३ महिने आहे. मात्र, मी याआधी कधीही कोरोनासारखी महामारी पाहिली नाही.

भारताच्या पहिल्या मतदाराची प्रतिक्रिया
भारताच्या पहिल्या मतदाराची प्रतिक्रिया

By

Published : Apr 1, 2020, 11:10 AM IST

शिमला- स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार श्याम सरन नेगी यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. देशभरात असलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन करत घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

ईटीव्हीसोबत त्यांनी खास बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, की माझे वय १०३ वर्ष आणि ३ महिने आहे. मात्र, मी याआधी कधीही कोरोनासारखी महामारी पाहिली नाही. ज्यामुळे, देशाला लॉकडाऊन करण्याची वेळ येईल. आपण दररोज या भयंकर विषाणूबद्दल टीव्ही आणि रेडिओवर ऐकत असल्याचे त्यांनी म्हटले.

लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डगमगली आहे. पूर्ण जगभरात पसरलेल्या या विषाणूसोबत लढण्यासाठी अद्याप कोणाकडेच खात्रीशीर उपचार नाहीत. श्याम सरन नेगी यांनी सांगितले, की जेव्हा पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली तेव्हापासून ते पूर्णपणे या सूचनेचे पालन करत आहेत.

स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार श्याम सरन नेगी

नेगी यांनी या विषाणूसोबत लढण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. यासोबतच त्यांनी अशा परिस्थिती नागरिकांना एकमेकांपासून अंतर ठेवून राहण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच कोणत्याही प्रकारचा नियम न तोडण्याचे आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details